Ad will apear here
Next
पालघर जिल्हा परिषदेत कॉफी विथ सीईओ
पालघर : पालघर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात ‘कॉफी विथ सीईओ’ हा कार्यक्रम नुकताच झाला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त करण्यात सहकार्य करणाऱ्या व उलेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमांतर्गत मेडल देऊन गौरविण्यात येते. 

या वेळी डहाणू येथील निकने ग्रामपंचायतीच्या सरपंच दुबळा यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले. विक्रमगड तालुक्यातील बंगारचोळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा स्वच्छता मेडल देऊन गौरव करण्यात आला. येथील शिक्षकांनी २०० ते २५० शौचालयांची आखणी विद्यार्थ्यांसोबत केली. तसेच स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी केली व शाळेचे रूप बदलले. पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदून नळाची सुविधा व हात धुण्यासाठी विशेष जागा केली. पालघर तालुक्यातील दातविरे ग्रामपंचायतीला स्वच्छता मेडल देऊन गौरविण्यात आले. या वेळी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYKBF
Similar Posts
कुपोषण निर्मूलनाबाबत कीर्तनकारांची कार्यशाळा वाडा (पालघर) : ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा दोन’ यांच्यामार्फत वाडा तालुक्यातील ६० कीर्तनकार/ प्रवचनकार यांची कुपोषण निर्मूलनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पंचायत समिती सभापती नडगे मॅडम, उपसभापती पाटील. जिल्हा परिषद सदस्य
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची जव्हार तालुका भेट नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सहा जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील स्वयंसहायता गटांना, ग्रामसंघांना व विविध उपजीविका कार्यक्रमांना भेट दिली. ‘उमेद’ या राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले आहेत.
‘पालघर हुतात्मा दिना’निमित्त शहिदांना अभिवादन पालघर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'सन १९४२ च्या 'चले जाओ' आंदोलनामध्ये पालघर हे महत्त्वाचे केंद्र होते. इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता. या उठावामध्ये पालघर तालुक्यातील पाचजण शहीद झाले. या शहिदांचे स्मारक उभारण्यात आलेल्या पालघरच्या हुतात्मा चौकात ह्या शूरवीरांना आज मानवंदना देण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language